किकवी येथील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालयात नेत्रदीपक वारकरी दिंडी सोहळ्याचं आयोजन..
भोर प्रतिनिधी : सागर खुडे
किकवी शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय या प्रशालेतर्फे काल शनिवार दि.१३जुलै २०२४ रोजी अखंड महाराष्ट्राला संत परंपरेचा लाभलेला वैभवशाली धार्मिक वारसा जपण्याहेतू आषाढी एकादशीचे पार्श्वभूमीवर औचित्य साधून अभ्यासपूरक तसेच सहशालेय उपक्रमांतर्गत फुलांनी सुशोभित करून सजवलेल्या पालखीतून दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.विठ्ठल पांडुरंगाची रुक्मिणीची आरती करून संपूर्ण किकवी गावांमधून टाळ आणि मृदंगाच्या गजरामध्ये पायी दिंडी काढण्यात आली.
यावेळी किकवी परिसरातील, पंचक्रोशीतील असंख्य नागरिक विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन झाल्याचे दिसून आले. अशा या पायी दिंडीमध्ये चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषा साकारत मोठया संख्येने सहभाग नोंदवलेला देखील पाहावयास मिळाला. हा नेत्रदीपक सुखसोहळा पाहता जणू काही साक्षात श्री विठ्ठल,रुक्मिणी अवतरल्याचा भास होत होता. अशा या सुशोभित पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणी यांची आरती करून पायी दिंडीला सुरुवात झाली. ठिकठिकाणी नागरिकांनी पालखीचे पूजन केले. सहभागी चिमुकल्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात विठू नामाचा जागर केल्याने संपूर्ण परिसर भक्तीभावात न्हाऊन निघाला.”विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल” “ज्ञानोबा माऊली तुकाराम”अशा उद्घोषात मुलांची पायी दिंडी किकवीतील ग्रामस्थांच्या उपस्थिती सह निघाली.या दिंडीमध्ये मुख्यता भजनी मंडळाच्या सदस्या ह.भ.प सौ.विमल ताई अहिरे, ह.भ.प सौ.रत्नाताई भिलारे, ह.भ.प सौ. रुपालीताई राजगुरू,सौ.स्वातीताई पाटणे,केंजळचे मुदृंगवादक श्री.सुनील महाराज बाठे, ग्रामपंचायत शिपाई श्री.अशोक राऊत,श्री.मोहन राऊत, संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.राजेंद्र निगडे, संस्थेचे संचालक श्री.राजेंद्र कोंढाळकर तसेच प्राथमिक शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. शशिकांत गुरव सर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.दत्तात्रय भिलारे यांनी देखील साथ दिली.अशा पद्धतीने हरिनामाच्या जयघोषात विद्यालयाच्या तसेच प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी फुगडी खेळण्याचा देखील आनंद लुटला.आणि अशा या पालखीचे सर्व नागरिकांनी मनोभावे दर्शन घेतले.
प्रसंगीच्या कार्यक्रमासाठी किकवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष.मा.श्री दत्तात्रय भिलारे यांनी सर्व शिक्षक_ शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुकही केले.
तसेच विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.विनोद राऊत सर यांनी उपस्थित पदाधिकारी,पालक, आणि भजनी मंडळाचे सदस्य,ग्रामस्थ यांचे देखील श्रीफळ देऊन आभार मानले.
या प्रसंगीच्य कार्यक्रमासाठी पालकांसह, किकवी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पाहायला मिळाले.