आदर्श शिक्षक गुणगौरव समारंभात श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद राऊत यांना केले सन्मानित.


 

कार्यकारी संपादक: सागर खुडे

 

पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ संलग्न भोर तालुका मुख्याध्यापक संघ व मुख्याध्यापक संघ (वेल्हे)राजगड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने भोर व राजगड तालुक्यातील गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुणगौरव समारंभ शनिवार दिनांक १९ऑक्टोबर २०२४ रोजी जानकीराम मंगल कर्यालय बनेश्वर रोड नसरापूर या ठिकाणी घेण्यात आला.

या प्रसंगी कार्यक्रमास अध्यक्ष श्री.नंदकुमार सागर (अध्यक्ष, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ व सचिव महा. राज्य मुख्याध्यापक महामंडळ ) तसेच प्रमुख पाहुणे श्री अनिल गुंजाळ ( मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद, पुणे), श्री राजकुमार बामणे ( गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती भोर)उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्री शिवाजीराव किलकिले (विश्वस्त, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ), श्री कुंडलिक मेमाणे(अध्यक्ष, सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघ),श्री सुधाकर जगदाळे (उपाध्यक्ष सेकंड. स्कूल सोसा. मुंबई), श्री विठ्ठल चिकने (उपाध्यक्ष पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ) व मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन भोर तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष श्री.सुनील गायकवाड व सचिव श्री.पंढरीनाथ टापरे तसेच राजगड(वेल्हे)तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष श्री शंकर नाकती व सचिव श्री संतोष चव्हाण व सर्व मुख्याध्यापक संघ कार्यकारणी सदस्य यांनी केले.

या प्रसंगी किकवी शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालयचे मुख्याध्यापक श्री.विनोद दशरथ राऊत सर, न्यू इंग्लिश स्कूल कामथडीचे मुख्याध्यापक श्री.जयवंत पंडित कुंभार , तोरणा विद्यालय वेल्हेचे प्राचार्य श्री.अमर एकनाथ बनसोडे व पिसावरे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सुभाष वसंतराव जाधव यांना आदर्श-गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी श्री.राजेंद्र सोनावणे सर (खानापूर), श्री.योगेश नाळे सर (सारोळा),श्री.शंकर बाबर सर(भोर), श्री.दत्तात्रय शिंदे सर(वाढाने)

डी.बी भिलारे सर(भोर),सौ. सविता रांजणे मॅडम(वाठर हिंगे),श्री.रामदास वीर सर(सांगवी), श्री.प्रल्हाद जेधे सर(नाटंबी), श्री.नितीन माळी सर (पासली),श्री.शरद खरतळकर सर (विंझर),श्री.राजेंद्र कोंढाळकर सर (पानशेत), श्री.संतोष देशमाने सर (वाजेघर),श्री रामदास साळुंके सर (वेल्हे),सौ.आशा कुथवळ मॅडम (पानशेत),सौ.सुहासिनी कांबळे मॅडम (मालेगाव) या सर्व शिक्षकांना आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये शिक्षकेतर कर्मचारी श्री.युवराज सनस(महुडे),श्री

दत्तात्रय जेधे(कांबरे), श्री

पोपट पवार(केळवडे),श्री.लक्ष्मण उल्हल्कर(कुरगवडी),श्री.सचिन चंदनशिव(बाजारवाडी), श्री बाळू कांबळे(दापोडे), श्री.भालचंद्र सोरटे (विँझर),श्री.मधुकर खाटपे (रायरी),श्री सुभाष सोंडकर(हातवे) यांना गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.सुनील गायकवाड यांनी केले व आभार श्री.संतोष चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवण व पाहुण्याच्या स्वागताने झाली. सर्व पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमासाठी भोर व राजगड तालुक्यातील माध्यमिक शिक्षक व पुरस्कार प्राप्त कर्मचारी यांचे कुटुंबीय मोठ्या संखेने उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!