वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी काळेपडळ पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला, कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याची इंट्री !


( पुणे जिल्हा ) संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी. पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्याचे आदेश आदरणीय पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नुकतेच दिले असून यामध्ये जवळपास 18 पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या यामध्ये काळेपडळ पोलीस पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मानसिंग पाटील यांची भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बदली झाल्यानंतर या रिक्त पदावर कर्तव्यदक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांची काळेपडळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून तेथील त्यांनी पदभार स्वीकारला असून यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य राहील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर या पुणे शहर पोलीस दलातील अत्यंत धडाडीच्या आणि कार्यक्षम अधिकारी तसेच लेडी सिंघम म्हणूनही त्यांना चांगलेच ओळखले जाते. त्या यापूर्वी डेक्कन पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या तेथेही त्यांनी यशस्वीपणे आपला कार्यभार सांभाळला होता. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चांगलाच वचक ठेवत त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील दिसून आल्या. आपल्या कडक शिस्तीसाठी आणि गुन्हेगारांविरोधातील धडक कारवायांसाठी ओळखल्या जात होत्या. डेक्कन परिसरांत असताना त्यांनी सुरक्षिता वाढवण्यासाठी नाईट पेट्रोलिंग ( रात्रीची गस्त ) आणि सीसीटीव्ही बसवण्यासारख्या महत्त्वांच्या उपाययोजनांवर चांगलाच भर दिला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या नव्या एन्ट्रीमुळे काळेपडळ पोलीस ठाण्याला एक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याचे काळेपडळ परिसरांतून बोलले जात आहे. पोलीस ठाण्याच्या परिसरांतील विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्वसामान्यांसह तसेच पत्रकार अशा विविध मान्यवरांनी त्यांची सदिंच्छा भेट घेत शुभेच्छा दिल्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!