मा.ना. मकरंद (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
संपादक :दिलीप वाघमारे
लोणंद (ता. खंडाळा) — समाजकार्याची परंपरा कायम राखत मा.ना. मकरंद (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दिनांक 31 ऑक्टोबर रोजी लोणंद येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन मा. मिलिंद (दादा) पाटील यांच्या हस्ते होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबीर गणपती मंदिर, नगरपंचायत शेजारी, लोणंद येथे सकाळी ९ वाजता सुरू होईल. या निमित्ताने परिसरातील युवक, सामाजिक संघटना आणि आरोग्यसेवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
रक्तदान शिबीराचे आयोजन पाटील परिवार आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याने या उपक्रमातून समाजातील गरजू रुग्णांना नवजीवन मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमास विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, तसेच लोणंद परिसरातील नागरिक उपस्थित राहणार असून, वाढदिवस साजरा करण्याचा हा सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे.


