लोणंद येथील शास्त्री चौकातील मासे विक्री बाजार योग्य ठिकाणी स्थलांतर करा
दिलीप वाघमारे संपादक
लोणंद शहरातील कार्यक्षेत्रात सन 2025 मध्ये मुख्य रस्त्यालगत नागरिकांनी केलेले अतिक्रमण हटवले लोणंद पोलीस लोणंद नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने अवैध्य अतिक्रमण हटवणे बाबत कार्यवाही झाली दरम्यान लोणंद नगरपंचायत यांच्या हद्दीतील शास्त्री चौकातील येथील अतिक्रमण हटवण्यात आले सदरचे अतिक्रमण हटवताना मच्छी व्यापाऱ्यांना अभय दिले नागरिक ग्रामस्थ पार्किंग केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताला निमंत्रण मिळत आहे तसेच या ठिकाणी निंबोडी जाण्यासाठी बस थांबा तसेच लोणंद सातारा वाहतुकीचा थांबा आहे तसेच लोणंद सातारा रोडवरील कोंबडी बाजार स्थलांतर होऊन बाजार तळाकडे गेला आहे याच धर्तीवर मच्छी मार्केट व्यापारांची स्थलांतर करून पुनर्वसन करणे काळाची गरज आहे यापूर्वी हा बाजार मच्छी मार्केटमध्ये गेला होता तेथे धंदा पाणी होत नसल्याने नगरसेवकांच्या मार्फत पुन्हा त्याच जागेवरती बाजार आला आहे मच्छी मार्केट मुळे सर्वत्र दुर्गंधी आणि पावसाळ्यात पाणी साठल्यामुळे डास मच्छर याला निमंत्रण दिले जाते सातत्याने या ठिकाणी डोकं दुखीचा विषय म्हणजे मच्छी मार्केट याबाबत निवेदन नगरपंचायत यांना यापूर्वी देण्यात आले त्याची दखल अद्याप न घेतल्यामुळे आंधळ दळतय कुत्रा पीठ खातेय अशी अवस्था नागरिकांची झाली आहे योग्य वेळी स्थलांतर बाजार न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यशवंत दनाने यांनी दिला आहे


