पीआय विरोधात अत्याचारांचा गुन्हा; प्रताप दराडे यांची नियंत्रण कक्षात बदली, दराडेंची पोलीस अधीक्षकांकडे धाव..!!
संभाजी पुरीगोसावी (अहिल्यानगर जिल्हा ) प्रतिनिधी. सध्या अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील कोतवाली पोलीस ठाण्याचे सिंघम अधिकारी म्हणून ओळखले जाणारे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे (रा. अकोले ता. इंदापूर जि.पुणे ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रताप दराडे यांची तात्काळ नियंत्रण कक्षात नेमणूक केली आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक दराडे यांनी देखील दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध देखील जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे आपला तक्रार अर्ज दिला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे हे आता चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर पीडित 30 वर्षीय तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप घेतला आहे. आणि या प्रकरणी पीडित तरुणीने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. एका सिंघम वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर इतके गंभीर आरोप झाले आहेत. मात्र या अधिकाऱ्यावर आता कोणत्या स्वरूपातून कारवाई होणार याकडे देखील संपूर्ण राज्यांचे लक्ष लागून आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर गुन्हा दाखल होताच, पोलीस अधीक्षकांनी त्यांची नियंत्रण कक्षात रवानगी केली आहे. यावेळी पोलीस निरीक्षकांनी देखील पीडित तरुणीच्या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.