जालन्यात ! वहिनीबरोबर अनैतिक संबंध, प्रेम प्रकरणातून सख्या भावाचा खून मृतदेह धरणात फेकला, वहिनीची आणि भावाची पोलिसांना कबुली !
(जालना जिल्हा) प्रतिनिधी. नात्याला काळीमा फासणारा प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे. यामध्ये अनैतिंक संबंधातून घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस चांगलीच वाढ होताना दिसून येत आहे. विश्वासाच्या पायावरच कोणतंही नातं उभं असतं, मग ते मित्र मैत्रिणीचं असो, भावा बहिणीचं किंवा पती-पत्नीचा एकदा का विश्वास मोडला तर त्या नात्याला तडा जायला क्षणभरांचाही विलंब लागत नाही, प्रेमात पडलेला माणूस काहीही करू शकतो असं म्हणतात पण हे प्रेम दुसऱ्यासाठी जीवघेणं ठरेल, तर मग खूपच पंचाईत होतं आणि जीवन उद्ध्वस्त होतं. असाच प्रकार जालना जिल्ह्यातून समोर आला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यांत सोमठाणा या शांतप्रिय गावात घडलेली ही घटना आहे. ज्ञानेश्वर राम तायडे आणि त्याची पत्नी मनीषा हे दोघे समाधानात जीवन जगून आपला संसार करत होते. मात्र या पती-पत्नीच्या लग्नानंतर काही वेळातच घरातीलच सदस्याने म्हणजेच सख्या दिरांने आपल्या वहिनीबरोबर प्रेम संबंध जुळले होते. आणि या दोघांची प्रेम कहाणी मनीषा तायडे हिच्या पतीला समजली. परमेश्वर तायडे हा घरात कायमचा राहणार सखा दीर होता. आणि याची नजर आपल्या वहिनीवर म्हणजे मनीषा हिच्यावर हळुवार गेली ती अनैतिक प्रेम संबंधापर्यंत पोचली. या नात्याने दोघांनाही चांगलंच अंध बनवले होतं. मात्र भावजय मनीषा आणि भावातील सततची जवळीक ज्ञानेश्वराला संशयास्पद वाटू लागली होती. आणि याच अडथळ्यामुळे या पती-पत्नीने खुनाचा कट रचला, परमेश्वर बाजूला झाला तरच त्यांचं नातं मोकळं होईल अशा चुकीच्या विचाराने या दोघांनी अमानुष निर्णय घेतला, या पती-पत्नीने आपल्या सख्या भावाचा खून करून मृतदेह धरणात फेकला, परमेश्वर यांच्या वडिलांनी बदनापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे चांगलीच गतिमान करीत ज्ञानेश्वर तायडे आणि मनीषा तायडे यांच्यावर पोलिसांची चांगलीच नजर होती. अखेर अनैतिक संबंधातून खून केल्याचे पती-पत्नीने पोलिसांना कबुली दिली. या घटनेची नोंद बदनापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.

