मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन – आंबळे येथे १४ नोव्हेंबर रोजी सर्वांसाठी मोफत तपासण्या
मंगेश पवार
सासवड प्रतिनिधी:ग्रामीण रुग्णालय सासवड, ग्रामपंचायत आंबळे आणि भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर सभा मंडप, आंबळे येथे पार पडणार आहे.
या शिबिराचे प्रमुख उद्घाटक डॉ. विक्रम काळे (तालुका गट विकास अधिकारी), डॉ. प्रणोली श्रीश्रीमाळ (तालुका आरोग्य अधिकारी) आणि डॉ. शुभांकर देशमुख (वैद्यकीय अधिकारी, प्रा. आरोग्य केंद्र माळशिरस) असतील.
शिबिरात विविध आजारांसाठी मोफत तपासण्या व डॉक्टरांचा सल्ला दिला जाणार आहे.
तपासण्यांमध्ये
ब्लड शुगर
हिमोग्लोबिन
त्वचारोग
कान, नाक, घसा
हाडांचे आजार
फुफ्फुसाचे आजार
स्त्रीरोग तपासणी
सर्जरी व मेडिसिन
या उपक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, विशेषतः महिला, यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमात राजश्री थोरात (सरपंच, आंबळे), अजित जगताप (उपसरपंच, आंबळे), दत्तात्रय जगताप (सरपंच, राजेवाडी), राजेंद्र दरेकर, सरस्वती शेंडगे, मधुकर ढोले, विठ्ठल जगताप, सचिन दरेकर, गौरी कुंजीर, संगीता कुंजीर, मुक्ताबाई जगताप (अध्यक्ष, ग्रामविकास फाऊंडेशन व ग्रामपंचायत सदस्य) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे, साधना सचिन जगताप / दरेकर या भारती हॉस्पिटलच्या इन्चार्ज अधिकारी म्हणून संपूर्ण वैद्यकीय पथकासह या शिबिराचे समन्वयक कार्य पाहणार आहेत.त्यांच्या पुढाकारामुळे आंबळे गावात दर्जेदार आरोग्य सेवा थेट ग्रामस्थांच्या दारात पोहोचवली जाणार आहे.
भारती हॉस्पिटलचा वैद्यकीय स्टाफ, डॉक्टर आणि सहाय्यक कर्मचारी यांच्याकडून सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार असून, औषधोपचार आणि सल्ला देखील विनामूल्य दिला जाणार आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राजमाता जिजाऊ महिला दूध उत्पादक संस्था, आंबळे जनसेवा ग्रुप, समस्त ग्रामस्थ आंबळे व राजेवाडी आणि आयुष्यमान केंद्र, आंबळे यांनी पुढाकार घेतला आहे.
ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी शिबिरासाठी मोठ्या उत्साहाने तयारी केली असून, “आरोग्यदायी आंबळे” या संकल्पनेखाली ग्रामस्थांनी शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


