२० वर्षांनी दहावीच्या वर्गमित्रांचा भावनिक गेट-टुगेदर सारोळे येथे उत्साहात संपन्न.
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
संपादक मंगेश :पवार
कार्यकारी संपादक :सागर खुडे
सारोळे (ता. भोर):२००४-०५ च्या दहावीच्या बॅचमधील तब्बल २८ मित्र-मैत्रिणींचा गेट-टुगेदर कार्यक्रम तब्बल २० वर्षांनी, २२ जून २०२५ रोजी सारोळे येथील “नानाची वाडी” या हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला.
सकाळपासूनच जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व मित्रमैत्रिणी एकत्र आले. कार्यक्रमाची सुरुवात एकमेकांच्या स्वागताने आणि जुन्या आठवणींनी भरलेल्या गप्पांनी झाली. त्यानंतर सर्वांनी मिळून संगीत खुर्ची, गायन स्पर्धा अशा धमाल खेळांत सहभाग घेतला. विशेष आकर्षण म्हणजे नदीवर बोटिंगचा अनुभव, ज्यामुळे उपस्थितांचे बालपण पुन्हा जागे झाले.
कार्यक्रमानंतर दुपारी पारंपरिक जेवणाचा आस्वाद घेतला गेला. एकमेकांना भेटवस्तू देत, फोटो काढत आणि पुन्हा भेटण्याचे वचन देत कार्यक्रमाचा समारोप झाला.
या गेट-टुगेदरमुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यांतून आनंदाश्रू दिसत होते. जुने मित्र भेटल्याचा आनंद शब्दांत सांगता न येणारा होता, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.


