पसुरेतील भजन स्पर्धेत मिरजेवाडीचे मंडळ प्रथम
भोर:- पसुरे येथे दुर्गामाता महिला भजनी मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या भजन स्पर्धेत मिरजेवाडी (ता.खंडाळा,जि.सातारा) येथील ओम चैतन्य कानिफनाथ भजनी मंडळाने प्रथम क्रमांकाचे सात हजार रुपयांचे रोख बक्षीस पटकावले. नानाचीवाडी,शिंदे(ता .भोर) येथील श्री ज्ञानाई भजन मंडळाने द्वितीय क्रमांकाचे पाच हजार, विंग (ता.खंडाळा) येथील रामेश्वर भजन मंडळाने तृतीय क्रमांकाचे तीन हजार तर नसरापूर (ता.भोर) येथील स्वामी समर्थ भजन मंडळाने उत्तेजनार्थ दोन हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. प्रत्येक विजेत्यास चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पर्धेचे पंधरावे वर्ष असून अकरा संघांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन सरस्वती ,वीनापूजन व दिपप्रज्वलनाने झाले. दुर्गामाता महिला भजनी मंडळाने पंचपदी सादर केल्यावर स्पर्धेला
सुरुवात झाली. सर्व भजन मंडळांनी नियमाप्रमाणे दिलेल्या बारा मिनिटात एक अभंग, एक गवळण असे गायन सादर केले. प्रत्येक भजनी मंडळास प्रमाणपत्र देण्यात आले. निरीक्षक म्हणून खटाव (सातारा) येथील किरण भोसले व रवींद्र खंडाळकर यांनी काम पाहिले.पखवाज,ढोलकी व तबला जुगलबंदी घेण्यात आली. भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
स्पर्धेसाठी खान हॉस्पिटलचे डॉ
इम्रान खान, धन्वंतरी हॉस्पिटलचे डॉ.चैतन्य गायकवाड, शांताराम सणस, महेंद्र व उत्तम शिंदे,संदीप बि-हामणे, ज्ञानेश्वर अनभुले यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक तंटामुक्ती अध्यक्ष मनोज धुमाळ, सुत्रसंचलन भानुदास दुधाणे यांनी केले. मंडळाच्या अध्यक्षा प्रमिला जंगम, उपाध्यक्ष लता बि-हामणे
सचिव सुरेश जंगम, विलास दुधाणे, भानुदास दुधाणे, राजेंद्र गव्हाणे यांनी स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले. यावेळी पंचक्रोशीतील प्रेक्षक उपस्थित होते.


