खंडाळा- महात्मा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महोत्सवानिमित्त क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथे मंगळवार रोजी मोफत दंत व सामान्य आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.


 

खंडाळा सातारा : धर्मेंद्र वर्पे

दंत व सामान्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त महोत्सवानिमित्त क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथे मोफत दंत व सामान्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.मिलींद मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या शिबिरात भोसले डेन्टल क्लिनिक चे संचालक डॉ.स्वप्निल भोसले यांनी दातांची काळजी या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करुन तपासणी केली, डॉ.मृणाल भोसले-कांबळे स्त्री रोग, त्वचारोग सामान्य आरोग्य तपासणी केली तसेच मेडिप्लस मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल शिरवळ चे संचालक डॉ.मंगेश शेणकर यांनी रक्तदाब, साखरेचे प्रमाण, ईसीजी द्वारे विद्यार्थी व कर्मचार्यांची आरोग्य तपासणी व उपचार करून आहार व आरोग्य विषयक मूलभूत मार्गदर्शन केले. या आरोग्य शिबिरात १५० च्या आसपास विद्यार्थी व कर्मचार्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.मुकुंद आमले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जयंती महोत्सव समिती चेअरमन डॉ.कविता खिल्लारे, आरोग्य तपासणी शिबिर समिती चेअरमन डॉ.विश्वास साळुंखे,सहा.संचालक विद्यार्थी कल्याण मंडळ डॉ.अजित माळी उपस्थित होते.

ADVERTISEMENT

शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ.साईनाथ भोकरे, डॉ.उमा तुमडाम, डॉ.गायत्री वानखेडे आरोग्य समितीचे सचिव सचिन चौधरी,नितीन कदम,संदीप जानकर व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!