शिवसेना सातारा जिल्हा समन्वयक रामदास कांबळे यांचा आ.शशिकांत शिंदेना शब्द वाई विधानसभेत जास्त प्रमाणात मतदान देण्याची ग्वाही.


 

खंडाळा (सातारा ): धर्मेंद्र वर्पे

सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आ.शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने आ.शशिकांत शिंदे हे सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत.

नुकताच आ.शशिकांत शिंदे यांचा अर्ज हा माजी केंद्रीय कृषी मंत्री व पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना उपनेते व पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत भरण्यात आला.याच पार्श्वभूमीवर सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीची प्रचार यंत्रणा कंबर कसु लागलेली आहे.आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून भेटी गाठीना जोर आलेला आहे.आ.शशिकांत शिंदे हे वाई विधानसभा मतदारसंघातून सुद्धा भेटी गाठी घेत आहेत.शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हा समन्वयक रामदास कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट झाली.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचेच नेते मंडळी,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहत आ.शशिकांत शिंदे यांचे स्वागत केले.वाई विधानभा मतदारसंघातून आ.शशिकांत शिंदेंना मताधिक्य देणार असल्याचा निर्धारच करण्यात आलेला आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मोठया ताकतीने हा आ.शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी उभा असणार असल्याचे जिल्हा समनव्यक रामदास कांबळे आणि वाई विधानसभेचे संघटक नंदकुमार घाडगे यांनी सांगितले.पक्षाचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊन सच्चे शिवसैनिक हे ही निवडणूक मोठ्या ताकतीने लढण्यासाठी सज्ज झालेली आहे.या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे हे खासदार बनणार आहेत.यासाठी वाई विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा असणार आहे असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून व्यक्त करण्यात आला.आ.शशिकांत शिंदे यांची जिल्हा समनव्यक रामदास कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट होत असताना रामदास कांबळे यांनी मोठ्या विश्वासाने संवाद साधत चर्चा केली.ही लढाई आपल्या लोकशाहीच्या अस्तित्वाची आहे.आपली लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आम्ही प्रचारात कुठेही कमी पडणार नाही.असा विश्वास सुद्धा देण्यात आला.सातारा लोकसभा मतदारसंघात आ.शशिकांत शिंदे यांना महाराष्ट्रातून एक नंबरच्या मताधिक्याने निवडुन आणण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक तयारीला लागलो आहोत.असे नंदकुमार घाडगे यांनी म्हटले.खंडाळा तालुकाप्रमुख सागर कदम म्हणाले की खंडाळा तालुक्यातील शिवसैनिक हे एक संघपणे शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी उभे आहेत.त्यांना निवडुन आणण्यासाठी खंडाळा तालुका सज्ज असून सगळे जण

मतदानाच्या दिवसाची वाट पाहत आहेत.या चर्चेवेळी जिल्हा समन्वयक रामदास कांबळे यांच्या सह वाई विधानसभेचे संघटक नंदकुमार घाडगे,युवासेना जिल्हा प्रमुख माऊली पिसाळ,खंडाळा तालुकाप्रमुख सागर कदम,माजी तालुकाप्रमुख संपत मगर,उपविभागप्रमुख बाळासाहेब जाधव,महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख हेमा गायकवाड,शिरवळ शहरप्रमुख शहीद तांबोळी,युवासेना तालुका प्रमुख मयूर कारळे,युवा सेना उपतालुकाप्रमुख अभिषेक जाधव,युवासेना खंडाळा शहरप्रमुख सफ्रीयान सय्यद,शिरवळशहर समनवयक दीपक चव्हाण,उपविभागप्रमुख अतुल काश्वेद,विभागप्रमुख गणेश मांढरे तसेच तालुक्यातील आजी माजी शिवसेनेचे प्रमुख व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!