अखेर ग्रामस्थांनी लावला स्वखर्चाने दर्शवणारा गावचा बोर्ड.


 

सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी

मेढा : – जावळी तालुक्यातील दिवदेव हे गाव सह्याद्री डोंगराच्या माथ्यावर वसलेले कालांतराने काही घरे सह्याद्रीच्या पायथ्याला म्हणजेच सातारा महाबळेश्वर रोड लगत काही घरांची वस्ती वसली गेली दिवदेव या मुळगावच्या पोटातील वस्ती म्हणजे दिवदेववाडी तालुक्याचे ठिकाण मेढा या पासून साधारण ४ ते ५ किमी अंतर असणारी दिवदेवाडी पुर्वी या गावची ओळख असणारा (बोर्ड )पाटी होती परंतु पंढरपूर महाड हायवे झाल्याने गावाकडे दर्शवनारा पाटी काढली गेली परंतु गेली ३ ते ४ वर्षे पुन्हा पाटी लागलीच नाही संबंधित खात्याशी PWD सर्पक साधला आज उद्या लावूया परंतू लागली नाही पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी भेटून सांगून सुद्धा पाटी लागली नाही शेवटी ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्वखर्चाने गावाकडे दर्शवणारी दिवदेववाडी पाटी लावली यावेळी मा.सरपंच तुकाराम जुनघरे , सोसायटी संचालक शामराव जुनघरे , मा. सरपंच अविनाश जुनघरे , ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव जुनघरे,तुकाराम जुनघरे (चेअरमन ), विष्णू  जुनघरे , अशोक जुनघरे व ग्रामस्थ युवक उपस्तीत होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!