शिक्षक दिनानिमित्त सारोळे जिल्हा परिषद शाळेस शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांची भेट.
दि.६ सारोळे : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन पुणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा सारोळे येथे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे आणि भोरचे गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे यांनी शाळेला दि. ५ रोजी भेट दिली.
अपूर्णाला पूर्ण करणारा,
शब्दांनी ज्ञान वाढविणारा,
जगण्यातून जीवन घडविणारा,
तत्वातून मूल्ये फुविणाऱ्या
ज्ञानरुपी गुरु म्हणजे शिक्षक …
वंदना कोरडे शिक्षिका सारोळे शाळा
यावेळी शाळेत “स्पॅनिश भाषा” कशी शिकवली याबद्दल शिक्षिका वंदना कोरडे यांनी माहिती दिली. सुरुवातीला अडचणी आल्यानंतर youtube च्या माध्यमातून स्वतः नोट्स बनवून पुढे विद्यार्थ्यांना शिकवली.
यापुढे असेच शाळेतील सर्व मुलांना जास्तीत जास्त” स्पॅनिश भाषा”शिकवणार असे सांगितले.तसेच शाळेतील सातवी च्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स साहित्य तयार करून दाखवले. व इयत्ता चौथीच्या वर्गाची गुणवत्ता तपासणी केली असता सर्व मुलांनी छान उत्तरे दिली शाळेतील सर्व मुलांचे व शिक्षकांचे कौतुक केले. 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांचा त्यांनी सत्कार केला.
यावेळी शाळेतील मुलींनी स्पॅनिश भाषेतील गाणं सादर केले.त्यानंतर शाळेतील माय रियल हिरो उपक्रम अंतर्गत ग्रामपंचायत सदस्य काळुराम महांगरे यांच्या मुलीने शिक्षणाधिकारी यांना कामासंदर्भात विविध प्रश्न विचारले तसेच इतर मुलांच्या प्रश्नांची उत्तरेही शिक्षणाधिकाऱ्यांनी उस्फूर्तपणे दिली.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळा सारोळे केंद्रप्रमुख मुख्याध्यापक विजयकुमार थोपटे, सहशिक्षक संदीप सावंत, कांचन थोपटे, छाया हिंगे,अर्चना वानखेडे, जया जाधव, जयश्री शिर्के यासह ग्रामस्थ पालक आदी उपस्थित होते.
शाळेमध्ये “स्पॅनिश भाषा” शिकवली जाते. त्यासाठी वंदना कोरडे यांनी खूप परिश्रम घेतले.यापुढे विद्यार्थ्यांसाठी असेच शाळेत नवनवीन उपक्रम राबवणार. विद्यार्थ्यांना “स्पॅनिश भाषा ” पुस्तके वंदना कोरडे यांचेकडून शाळेतील गोरगरीब गरजू मुलांना मोफत देणार आहेत आणि इतरांना माफक दरात देणार आहे.
केंद्रप्रमुख मुख्याध्यापक विजयकुमार थोपटे