मुलीचा विनयभंग करून घरातील २ जणांना मारहाण ; पोलिसात तक्रार दाखल
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
वाई तालुक्यातील एका गावात जमिनीच्या वादातून एका मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी वाई पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दि. २५ रोजी दुपारी २:४० वा. सुमारास मुलीच्या आजोबांनी दिलेल्या फिर्यादनुसार त्यांचा घरा समोर जागेच्या वादातून आबुराव सणस याची पत्नी व मुलगा, नारायण सणस, राजाराम सणस यांचा मुलगा ( नाव माहीत नाही ) सर्व राहणार मेणवली यातील अबुराव यांच्या मुलाने फिर्यादी यांच्या नाती बर अश्लील चाळे केले व तिला लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तणूक केली तसेच बाकीच्या लोकांनी फिर्यादी यांचे जावई व पुतणी यांना हाताने मारहाण केली व घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या व जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून त्या ४ जणांच्या विरुध्द वाई पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून याचा अधिक तपास सफौ. मुंगसे करत आहेत.


