भोर तालुक्यातील सावरदरे गावच्या सरपंच पदी गणेश साळुंखे यांची निवड.
मंगेश पवार
सारोळे : भोर तालुक्यातील सारोळे ते वीर महामार्ग शेजारील सावरदरे ग्रामपंचायतच्या सरपंच पदी गणेश साळुंखे यांची सोमवार दि.२७ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सावरदरे गावचे मावळते सरपंच जितेंद्र साळुंखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे सरपंच पदाची जागा रिक्त होती. निवडणूक निर्णय अधिकारी लहारे भाऊसाहेब
यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.
सरपंच पदासाठी गणेश साळुंखे यांचा एकमेव अर्ज आल्याने
लहारे भाऊसाहेब यांनी गणेश साळुंखे यांची सरपंच पदी बिनविरोध निवडीची घोषणा केली.
सावरदरे गावामध्ये झपाट्याने विकास होत आहे. गावातील रस्ते, लाईट, पाणी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा याकडे विशेष लक्ष देणार आहे. व राहिलेल्या उर्वरित कामासाठी वाढीव निधी मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करणार असून परिसरातील मान्यवरांसह सर्व सदस्यांना बरोबर घेऊन राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
मावळते सरपंच जितेंद्र साळुंखे यांनी एटीएम द्वारे शुद्ध केलेले पाणी घरोघरी पोहोचेल अशी व्यवस्था करणार, असे यावेळी सरपंच गणेश साळुंखे यांनी पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले. यावेळी मावळते सरपंच जितेंद्र साळुंखे, ग्राम सदस्य संदीप यशवंत साळुंखे ग्राम. उपसरपंच छाया पोपट पापळ,ग्राम. सदस्य मंगल अंकुश साळुंखे,ग्राम.सदस्य स्वाती युवराज कारळे,ग्राम सदस्य सुनीता राजेंद्र साळुंखे,
भाजपा तालुका उपाध्यक्ष विनोद चौधरी, अनिल मारुती साळुंखे, अनिल सोपान साळुंखे मा.उपसरपंच, ज्ञानोबा साळुंखे, सत्यवान शंकर साळुंखे, युवा उद्योजक नवनाथ महादेव साळुंखे, संतोष तुकाराम साळुंखे, अमित मानसिंग साळुंखे,बाबा भंडलकर, राहुल पवार,मा. उपसरपंच राजेंद्र धाडवे,अक्षय नामदेव साळुंखे.
यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ तसेच तरुण युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश साळुंखे यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी जेसीबी वरून गुलाल व आतिषबाजी करीत मोठा जल्लोष केला. ग्रामविकास अधिकारी यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.
गावात जलजीवन च्यामाध्यमातून पिण्याचे शुद्ध पाणी,कचरा व्यवस्थापन, तसेच गावच्या वस्त्यांवर चांगले रस्ते बांधण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रयत्न करणार. राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिक महत्त्व देणार असल्याचे नवनिर्वाचित युवा सरपंच गणेश साळुंखे यांनी पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले.
युवा सरपंच गणेश साळुंखे सावरदरे