सातारा पुणे महामार्गावर शिंदेवाडी येथे पिकअपची व रिक्षाला धडक.


 

भोर प्रतिनिधी : सागर खुडे

सातारा पुणे महामार्गावर शिंदेवाडी येथे पिकं अपने रिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अशी तक्रार संभाजी सोपान मोरे वय वर्ष ५९रा. सध्या हिलटॉप सोसायटी केसरी चौक पार्वती कुंज अपार्टमेंट धनकवडी पुणे ४३मुळ रा.साळवडे ता भोर जि पुणे यांनी शिंदेवाडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.पिकअप गाडीचा चालक तेजसिंह रा . नेवाळा फाटा रत्नागिरी असे आरोपीचे नाव आहे .

याबाबत पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक २६ मे २४ रोजी २.३० वा चे सुमारास शिंदेवाडी ता भोर जि पुणे गावचे समोर पुणे ते सातारा रोडवर सातारा बाजुकडे जाणारे लेनवर महेंद्रा कंपनीची पिकअप क्र.

एम.एच०८ डब्लु१९७६ हिचा चालक तेजसिंह वय वर्षे अंदाजे ४९राहणार नेवाळा फाटा रत्नागिरी.

याने पिकअप जिप ही भरधाव वेगात वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे चालवुन रिक्षा क्र.

एम.एच.१२के.आर४१००

हिस पाठीमागुन धडक देवुन अपघात केला आहे. प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने पोलिसांनी २५०/२०२४ भादवि कलम २७९,३३८,३३७,४२७ मो.वा.का.क १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

अपघातात संभाजी मोरे , बाळासाहेब पडवळ अनुसया बाळासाहेब पडवळ , जुबेदा करीम शेख यांना डोक्यास गंभीर व किरकोळ दुखापती झाल्या आहेत‌. रस्त्याचे डिव्हायडरचे बाजुला बसलेले मारूती सोनबा राऊत व त्यांची पत्नी सुभद्रा मारूती राऊत दोघे रा विझंर ता वेल्हा जि पुणे यांना गंभीर व किरकोळ दुखापती झाल्या आहेत पिकअप वरील चालक हा अपघातात सर्वांचे दुखापतीस व दोन्ही वाहनांचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे . अशी तक्रार संभाजी मोरे यांनी दाखल केली आहे.

अधिक तपास प्रभारी अधिकारी राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुर्यवंशी पाहत आहेत.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!