कॉलेजमधलं प्रेम संबंधाच्या कारणांतून धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, आरोपींचा पाठलाग करून वालचंदनगर पोलिसांनी अवघ्या 2 तासांत ठोकल्या बेड्या,


संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी भवानीनगर (ता. इंदापूर) येथे मुलींच्या प्रेम संबंधातून दोन विद्यार्थ्यांच्या वर कोयत्याने वार केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला, असून यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे, कोयत्याने मारामारी मध्ये सहभागी झालेले विद्यार्थी बारामती,इंदापूर तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती, अदमान महंमद शेख (वय 19 रा. सणसर) पियुष प्रथम चव्हाण (वय 19 रा.सणसर) यशराज गणेश अरवडे (वय 19रा. सणसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या मारामारीमध्ये सुजल जाधव हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर बारामतीत खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर संचित बाळासो घोळवे ही जखमी झाला आहे, सदरची घटना ही मुलींच्या प्रेम संबंधातून कोयता हल्ला झाला आहे, मात्र विद्यार्थ्यांनी आपापसात मिटवला असल्याचेही पोलिसांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुगणे आपल्या स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली, सदरच्या कोयता हल्ल्यानंतर आरोपी पुणेच्या दिशेने पळून चालले होते, वालचंदनगर पोलिसांनी तातडीने वेगवेगळी दोन पथके तयार करून पुण्याच्या दिशेने रवाना केली अखेर आरोपींना सिनेस्टाईलने पाठलाग करून सुपा पोलीस ठाणेच्या हद्दीमधील स्थानिक नागरिक यांच्या मदतीने आरोपींना अगदी शिताफीने ताब्यात घेवुन अटक करण्यात आली सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुगणे पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर पो. हवा. गुलाबराव पाटील बापू मोहिते,शैलेश स्वामी, गणेश काटकर,अजित थोरात,नानासाहेब आटोळे,सचिन गायकवाड अभिजीत कळसकर विक्रमसिंह जाधव आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!