पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांची सोलापूर नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली, तर पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्याचा स्वीकारला पदभार…
प्रतिनिधी: कलावती गवळी
मंगळवेढा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांची पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शनिवारी दुपारी सोलापूर कंट्रोल तथा दहशतवादी विरोधी शाखेकडे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे, तर त्यांच्या जागी सोलापूर दहशतवाद विरोधी शाखा येथून पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे हे रुजू झाले असून त्यांनीही तात्काळ शनिवारी सायंकाळी मंगळवेढा पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारला आहे, दरम्यान आपण लोकाभिमुख प्रशासक करण्यास अधिक प्रधान्य देणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले आहे, मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी मागील सहा महिन्यांपूर्वी पदभार घेतला होता, दरम्यान (दि. 25) जानेवारी रोजी बोराळे बीट हद्दीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे लाच प्रकरण पोलीस निरीक्षक ढवाण यांना भोवल्याची चर्चा आहे, त्यामुळेच त्यांच्यावर बदलीची कुऱ्हाड कोसळली आहे, शनिवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयकडुंन ढवाण यांच्या बदलीचा आदेश जारी करण्यात आला, त्यांची नेमणूक आता सोलापूर ग्रामीण कंट्रोल तथा दहशतवाद विरोधी शाखेकडे झाली आहे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे हे सन 2005 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा स्पर्धा आयोगाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होवून पोलीस खात्यात दाखल झाले आहेत, ते मूळचे सांगली जिल्ह्यातील आहेत त्यांनी आत्तापर्यंत मुंबई,वर्धा,धाराशिव कोल्हापूर येथे आपली सेवा बजावली आहे.