पार्ले गावच्या विकासासाठी महायुती कमी पडणार नाही – रामकृष्ण वेताळ.
कराड प्रतिनिधी ;-स्वप्निल गायकवाड.
पंचवीस वर्षात कराड उत्तर चा विकास रखडला आहे. हा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार आमदार होणे नितांत गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करुन मनोजदादा घोरपडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन भाजपचे किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केले. कराड उत्तर मतदार संघातील राजकीय दृष्ट्या कायमच महत्त्वपुर्ण असणाऱ्या पार्ले गावाने कायमच साथ दिली आहे ती अधिक घट्ट करावी असे आवाहन यावेळी मनोजदादा घोरपडे यांनी केले.
पार्ले ता. कराड येथे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार मनोज दादा घोरपडे यांचा गाव भेटू प्रचार रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळाला. पार्ले गावातून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. यामध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. महायुतीचे उमेदवार मनोज दादा घोरपडे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ, शेतकरी संघटनेचे नेते सचिन नलावडे, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने तसेच तुकाराम नलवडे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रामकृष्ण वेताळ म्हणाले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पार्ले आणि परिसराचा विकास झाला आहे. कोट्यावधी रुपयांची कामे या परिसरात मार्गी लागले आहेत. गेल्या 25 वर्षात या परिसरात रखडलेला विकास पूर्ण करण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून प्रयत्न झाले त्यामुळे कमळ चिन्हावर उभे असणारे महायुतीचे उमेदवार मनोज दादा घोरपडे यांच्या पाठीशी गावकऱ्यांनी ठामपणे उभे राहावे. येणाऱ्या काळात या परिसराचा विकास करण्यासाठी कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी कराड उत्तर उपाध्यक्ष सिमाताई घार्गे, स्नेहल कांबळे, नकुस चव्हाण, उपा नलवडे, पायल जाधव, प्रल्हाद नलवडे, राजेंद्र नलवडे, सचिन नांगरे, सुनील नलवडे, तानाजी नलवडे, संजय नलवडे, प्रकाश नलवडे, प्रदीप नलवडे, सुमित शहा व ग्रामस्थ उपस्थित होते.