तात्या तुमची आठवण आपल्या पुरीगोसावी कुटुंबाला कायम राहणार
संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी.
तात्या चला आता जातो पुण्याला तुम्ही लवकर पोरके केले आम्हांला तुमची कायम आठवण समोर राहणार..! कुठे आहेस रे ! असा फोन तुमचा कधी येईल मला, वडिलांच्या निधनानंतर तुम्ही मला, चुलत्याचे नातं कधीच भासू दिलं नाही, तुमचे नेहमीच मला मार्गदर्शन आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आपला मोठा परिवार होता. तात्यांनी आजपर्यंत आपल्या प्रवासामध्ये कुटुंबातच नव्हे, तर सर्वांशीच प्रेमळ आणि स्वयंमी शांतप्रिय असं आपलं नेतृत्व निर्माण केलं होतं तसेच एवढ्या मोठ्या पुरीगोसावी कुटुंबामध्ये देखील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, जागरण गोंधळ तसेच अशा विविध धार्मिक कार्यक्रम तात्या करायचे त्यामुळे तात्यांचा जनसंपर्क देखील दांडगा होता. माझ्या वडिलांच्या निधनानंतर तात्यांची माझ्यावर कायम लक्ष होते. आज तात्यांनी एवढ्या मोठ्या संपर्कातील जनसमुदायाला आणि पुरीगोसावी कुटुंबला लवकरच पोरके केले, तात्या तुमची कायमच आठवण समोर राहणार, तात्यांच्या समाधीचे अंत्यदर्शन घेताना संभाजी पुरीगोसावी.