वंचितांची आपली दिवाळी – ऊसतोड कामगारांच्या चेहऱ्यावर फुलला आनंदाचा प्रकाश


मंगेश पवार

न्हावी (ता.भोर, जि.पुणे) येथे नवज्योत परिवार ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने “वंचितांची आपली दिवाळी” हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत स्थलांतरित आदिवासी ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीचा फराळ तसेच दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

लाडू,करंजी,चकली, चिवडा,शंकरपाळी खेळणी,तेल,उटणे,मोती साबण,साड्या,तसेच नवे-जुने कपडे,भांडी अशा साहित्यामुळे कामगारांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. फराळाचे पदार्थ हातात घेताना आणि नवीन कपडे परिधान केल्यानंतर लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खऱ्या अर्थाने दिवाळी उजळून टाकणारा ठरला.

कार्यक्रमाला नवज्योत परिवार ट्रस्टचे अध्यक्ष संजय लगाडे, मंगेश वांजळे, शितल लगाडे, भास्कर कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी टोळी मालक नागेश नलावडे, कुंदन सोनवणे, शैलेश जगताप, प्रशांत सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले. शरद सोनवणे, अभिजित सोनवणे, अनिकेत भोसले, अविनाश भोसले यांनी संयोजनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली.

ADVERTISEMENT

नवज्योत परिवार ट्रस्टचे अध्यक्ष संजय लगाडे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी म्हटले, “ही मुलेही शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवू शकतात; समाजाने त्यांना साथ द्यावी.”

या निमित्ताने नियमित जि प प्राथ शाळा न्हावी शाळेत येणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांना नवज्योत परिवार ट्रस्टच्या वतीने दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास राजेंद्र सोनवणे,अनिल सोनवणे,प्रमोद कदम यांच्यासह ऊसतोड कामगार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“वंचितांची दिवाळी” या उपक्रमाने समाजातील दुर्बल घटकांना आनंदाचा किरण दिला असून,नवज्योत परिवार ट्रस्टचे हे सामाजिक कार्य संवेदनशीलतेचे व मानवी मूल्यांचे सुंदर उदाहरण ठरले आहे. असे गौरव उदगार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर सोनवणे (कर निर्धारण अधिकारी, न.प. खापा, नागपूर) यांनी काढले.

संतरंजन शर्मा,रजनी इनामदार,उद्योजक तुषार मेहता,सतिश मिसर, प्रभू देसाई ऊद्योजक चेतन शिवकर, प्रताप वाळंबे,सौ सिंगापुरकर यांनी सदर उपक्रमासाठी आर्थिक योगदान दिले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.अनिल चाचर यांनी केले,सूत्रसंचालन अनिकेत भोसले यांनी केले,तर आभारप्रदर्शन कुंदन सोनवणे यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!