लोणंदचे प्राध्यापक डॉ. क्षितिज राजाराम खरात यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर डॉक्टरेट पदवी मिळवली.
संपादक : दिलीप वाघमारे
लोणंद नगरीचे सुपुत्र, प्राध्यापक डॉ. क्षितिज राजाराम खरात यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधून फिजिक्स विषयामध्ये Ph.D. ( Doctor of Philosophy) डॉक्टरेट पदवी मिळवली. त्यासाठी त्यांना शिवाजी विद्यापीठाचे मा.कुलगुरू यांच्या हस्ते आज डॉक्टरेट ही पदवी देवून त्यांचा गौरव करण्यात आला .त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र शुभेच्छा देवून कौतुक होत आहे . त्यांनी लोणंद,कोल्हापूर, पंढरपूर, अहमदनगर तसेच मलकापूर येथे ते सध्या फिजिक्स विषयाचे प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. तसेच 28 वर्ष ते प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा व त्यांचे गुरूंचा खूप मोठा वाटा आहे .