जि प प्राथ शाळा न्हावी शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती (बालिका दिन) साजरी करण्यात आली


दि. ३ सारोळे : इयत्ता 4 थीच्या वर्गाने बाल सभेचे नियोजन केले होते.सुरुवातीला प्रतिमापूजन करण्यात आले.

कु.देवराज मदने या विध्यार्थ्याने म.ज्योतीराव फुले यांची वेशभूषा केली. तर शौर्या गांगुर्डे या विध्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली. पहिली व दुसरीतील विध्यार्थिनींनीही सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली.

यावेळी स्थलांतरित ऊस तोड कामगार मुलींचे स्वागत करण्यात आले.

1 ली ते 4 थी विध्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले.

सर्व शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती गोष्टीतून उलगडली.

इयत्ता 4 थीच्या मुलींनी सावित्रीबाईंच्या कार्यावर आधारित ओवीगायन केले.

1 ली /2 री च्या मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या गौरवगीतावर नृत्य सादर केले.

बालसभेचे प्रास्ताविक वरद सोनवणे याने केले,सूत्रसंचालन स्वरा सोनवणे हिने केले तर आभार श्रावणी वेदपाठक हिने मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!