क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नायगाव मध्ये


प्रतिनिधी शंकर माने : नायगाव (जि. सातारा) : शुक्रवार, ०३ जानेवारी २०२५

भारतातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त आज त्यांचे जन्मगाव नायगाव (जि. सातारा) येथे त्यांच्या स्मारकस्थळी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उपस्थित राहून अभिवादन केले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यात ‘ब’ वर्ग पर्यटन क्षेत्रांतर्गत उभारण्यात आलेल्या शासकीय प्रतिक्षालयाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच जलजीवन मिशनअंतर्गत वॉटर एटीएमचे, ‘महाज्योती’च्या विविध योजनांच्या प्रदर्शन दालनांचे आणि महिला बचतगटांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्री स्टॉल्सचेही उद्घाटन करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळेतील निबंध, चित्रकला व वकृत्त्व स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण आणि विविध क्षेत्रांतील यशस्वी महिलांचादेखील सन्मान करण्यात आला.

ADVERTISEMENT

यावेळी विधान परिषदेचे सभापती मा. रामजी शिंदे, माजी मंत्री मा. छगनजी भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री मा. पंकजाताई मुंडे, मा. आदितीताई तटकरे, मा. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा. जयकुमारजी गोरे, मा. अतुलजी सावे, मा. मकरंदजी पाटील, विधिमंडळातील सहकारी आमदार मा. अतुलजी भोसले, मा. मनोजजी घोरपडे, तसेच विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!