महिलांच्या तक्रारींना पोलीस विभागाने तात्काळ प्रतिसाद द्यावा:- पालकमंत्री शंभूराज देसाई


अंजली पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सातारा जिल्हा हा ऐतिहासिक आणि क्रांतीकारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यातील महिलांच्या बाबतीत मानसिक त्रासांच्या, छेडछाडीच्या तसेच हुंड्याबाबतच्या पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या महिलांच्या प्रत्येक तक्रारीला पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद द्यावा: व दोषींवर कडक कारवाई करावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी पोलीस विभागाच्या शिवतेज सभागृहात कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा घेतला. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह पोलीस विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

ADVERTISEMENT

महिला पथदर्शी प्रकल्पाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, महिलांच्या येणाऱ्या तक्रारी संवदेनशिलपणे हातळाव्यात. जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने पर्यटक कास पुष्प पठार, ओझर्डे, सडावाघापूरी धबधब्याकडे येत आहेत. या पर्यटकांना हुल्लडबाजांकडून त्रास होणार नाही यासाठी पोलीस तैनात करावेत.

पोलीस विभागाला जीथे जीथे मदतीची आवश्यकता असेल त्या त्या वेळेस पालकमंत्री म्हणून संपूर्ण सहकार्य केले जाईल. पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था आणखी चांगल्या पद्धतीने राखावी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पोलीस विभागाने कामांची उंची वाढवावी, असेही पालकमंत्री श्री. शंभूराज देसाई यांनी बैठकीत सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!