पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या CSR फंडातून भोर तालुक्यातील आपटी येथील वारकरी शिक्षण संस्थेस ५०,००० निधीचा संचालक भालचंद्र जगताप यांच्या हस्ते धनादेश प्रदान


दि.30 भोर:- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे च्या CSR फंडातून भोर तालुक्यातील आपटी येथे दि. 29 रोजी अध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था, भोर या वारकरी शिक्षण संस्थेस बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून आणि शुभहस्ते ५०,०००/- (पन्नास हजार रुपये) निधीचा धनादेश प्रदान करण्याचा कार्यक्रम आपटी येथे पार पडला.

 

कार्यक्रमास भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक सोमनाथशेठ सोमाणी, भोर तालुका राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते युवराज जेधे, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव स्वप्निल कोंडे, भोर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल धुमाळ, भोर शहर शिवसेनेचे अध्यक्ष आप्पा सोनवले, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश खोपडे, भोर तालुका विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष केतन चव्हाण, सकाळचे पत्रकार विलास मादगुडे, बँकेचे भोर तालुका विभागीय प्रमुख तसेच वसुली अधिकारी विनोदजी काकडे, आपटी शाखेचे विकास अधिकारी श्याम घोणे आदी उपस्थित होते.

ADVERTISEMENT

 

आपटी गावातील जेष्ठ नेते चिमाजी पारठे, जेष्ठ समाजसेवक बाळासाहेब गाडे, माजी आदर्श सरपंच रघुनाथ पारठे, आपटी विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन लक्ष्मण पारठे माजी चेअरमन जगन्नाथ पारठे, आपटी गावचे माजी सरपंच भिमाजी आलगुडे, संचालक दिलीप कुडले, रामचंद्र पारठे, शाळा समितीचे माजी अध्यक्ष जिजाबा पारठे, मुंबई भाजीपाला व्यापारी नवनाथ पारठे, सुदाम दादा पारठे, ऋषी महाराज शिंदे, विठ्ठल सपकाळ, विठ्ठल पारठे, सचिव विजय डेरे, संतोष महामुनी, नामदेव पारठे, प्रवीण पारठे आदिसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर मनोगत व्यक्त करताना माननीय भालचंद्रभाऊंनी राहुल महाराज पारठे यांचे तसेच अध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्थाचे समाजातील अध्यात्मिक आणि सामाजिक योगदानाबद्दल प्रशंसा करून भविष्यात सुद्धा या संस्थेला अधिकची मदत करण्याचे आश्वासन दिले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!