धक्कादायक घटना : नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून हत्या
नसरापूर : पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेल्या संतापजनक घटनेनंतर ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले आहेत. एका नराधमाने ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृणपणे तिचा खून केल्यानंतर गावकऱ्यांनी पुणे-सातारा महामार्गावर रास्ता रोको केला. पुण्याकडे आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूंचा मार्ग अडवून त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.
“जोपर्यंत आरोपी आमच्या ताब्यात दिला नाही तोपर्यंत मागे हटणार नाही,” अशी भूमिका ग्रामस्थांनी स्पष्ट केली. या आरोपीने यापूर्वी दोन वेळा अशीच कृत्ये केली आहेत, त्यामुळे स्थानिकांचा संताप दुप्पट झाला आहे. महामार्ग अडवल्याने वाहनांची लांबलचक रांगा लागल्या असून, तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत, परंतु ग्रामस्थ मागे हटण्यास तयार नाहीत.
या घटनेमुळे परिसरात भय आणि रोषाची लाट उसळली आहे.
प्रशासनाने तातडीने कारवाई करून आरोपीला ताब्यात घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.


