कैलासवासी शालन लक्ष्मण धायगुडे पाटील यांचे दुःखद निधन.
लोणंद प्रतिनिधी : दिलीप वाघमारे
ADVERTISEMENT
खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक येथील प्रगतशील बागातदार कैलासवासी लक्ष्मण धायगुडे पाटील यांची धर्म पत्नी शालन लक्ष्मण धायगुडे पाटील यांचे बुधवार दिनांक 19 जून रोजी राहत्या घरी दुःखद निधन झाले त्यांच्या अंत्ययात्रेस पुणे सातारा बारामती येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ बागायतदार खेड बुद्रुक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते लक्ष्मण धायगुडे पाटील यांनी मालकीची अनेक एकर जमीन रयत शिक्षण संस्थेला मोफत दिली होती त्यामुळे खेड बुद्रुक सारख्या ग्रामीण भागात त संस्थेचे वटवृक्ष निर्माण झाला हे गावाला विसरणं अशक्य आहे यासारखे अनेक कुटुंबांना दानशूर पणे दानधर्म मोफत करून सेवा केली होती अनेक संस्थेवरती ते संचालक पदी होते त्यांच्या पत्नीच्या निधनामुळे गावावरती शोक कळा पसरली होती त्यांच्या पश्चात मुले नातवंडे सुना असा परिवार आहे


