लोणंद शहरातील प्रभाग दोन मधील अनेक समस्या बाबत नेते हर्षवर्धन शेळके पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर.


 

लोणंद सातारा : दिलीप वाघमारे

 

प्रभाग क्रमांक 2 मधील पंजाब कॉलनी, झारेकरी वसाहत मधील गटारांची कामे होत नाहीत, वेळेवर घंटागाडी येत नाही, पाण्याचे वेळ अनियमित आहे यासाठी आज लोणंद नगरपंचायतवर प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले

 

लोणंद नगरपंचायतीवर प्रभाग क्र.2 च्या नागरिकांनी मोर्चा काढून एक वर्षे झाली तरी विकासकामे मार्गी लागली नाहीत, समस्या सोडवल्या जात नाहीत.

-अॅड सर्फराज बागवान

अध्यक्ष,खंडाळा तालुका राष्ट्रीय काँग्रेस

ADVERTISEMENT

 

पिण्याचे पाणी सोडण्याची वेळ, पथदिवे लावणे, घंटागाडी नियोजन, स्वछता करतेवेळी लोणंद शहरातील मूलभूत समस्या सोडवत असताना कोणत्याही प्रभागासोबत दुजाभाव करु नका

– श्री.हर्षवर्धन शेळके-पाटील

सरचिटणीस,युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा

 

निवेदनतील समस्यांचे निवारण त्वरित केले जाईल, गटारांची कामे पालखी होताच मार्गी लागतील

आवश्यक त्या सुचना इंजि.मोटे यांना दिल्या आहेत.

-मुख्याधिकारी श्री.गायकवाड सो.

 

यावेळी डॉ.किशोर बुटीयानी, बाळासो भाटिया, शत्रुघ्न झारेकरी, गुलशन भाटिया, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!