भोर एमआयडीसीसंदर्भात आर.ओ. डॉ. अर्चना पठारे यांच्यासोबत सखोल बैठक उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने नियोजनबद्ध चर्चा; गणेश निगडे यांचा पुढाकार
पुणे / प्रतिनिधी –
भोर तालुक्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी प्रस्तावित भोर एमआयडीसी प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक आज पुणे येथील एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी (आर.ओ.) डॉ. अर्चना पठारे यांच्या दालनात पार पडली.
ही बैठक उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्या विशेष पुढाकाराने ठरविण्यात आली. त्यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश शरदराव निगडे यांना वेळ देत, बैठकीसाठी अधिकृत नियोजन करून दिले.
बैठकीला डेप्युटी सीओ यांची देखील उपस्थिती होती. यावेळी आर.ओ. डॉ. पठारे मॅडम यांनी अत्यंत सखोल व मोलाची माहिती दिली. भोर एमआयडीसी होण्यासाठी अद्याप कोणत्या अडचणी आहेत, त्या अडचणी दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना गरजेच्या आहेत यावर सविस्तर चर्चा झाली.
गणेश शरदराव निगडे यांनी या चर्चेमध्ये भोरच्या औद्योगिक भविष्याकडे बोट दाखवत स्पष्ट मांडणी केली. त्यांनी सातत्याने मंत्रालय व संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवत भोर एमआयडीसीचा विषय अग्रक्रमावर आणला आहे.
येत्या काही दिवसांत या बैठकीतील मुद्द्यांवर अभ्यास करून, ठोस निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बैठकीनंतर देण्यात आली.
गणेश शरदराव निगडे यांचा पाठपुरावा आणि सक्रिय सहभाग हाच भोरच्या औद्योगिक विकासाचा आधार आहे, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.


