“देशसेवेसाठी सज्ज!” वागजवाडी येथील परफेक्ट अकॅडमीने घडवले तीन नवे जवान
मंगेश पवार
किकवी -वागजवाडी येथील परफेक्ट करिअर अँड फिटनेस अकॅडमी (महाले फिजिकल्स) मधील तीन तरुणांनी भारतीय सैन्यात यशस्वीपणे भरती होऊन संपूर्ण पंचक्रोशीचा गौरव वाढवला आहे.
मोरवाडीचे सुपुत्र ओंकार बाळासाहेब पेटकर, मयूर संजय पेटकर आणि सारोळा गावचे सुपुत्र श्रेयस राजेंद्र साळेकर हे तिघेही 2025 सालच्या सैन्य भरती प्रक्रियेत उत्तीर्ण होऊन भारतीय सैन्यात रुजू झाले आहेत.
या तिघांनी अकॅडमीतून घेतलेले कठोर, शिस्तबद्ध, तांत्रिक आणि शारीरिक प्रशिक्षण त्यांना या यशाची मजबूत पायाभरणी ठरले. भरतीपूर्व तयारीदरम्यान तिघांनी दाखवलेल्या जिद्दीला आणि परिश्रमांना आज यशाचा मुकुट लाभला आहे. त्यांच्या निवडीमुळे प्रशिक्षक, पालक आणि संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“या मुलांनी अपार कष्ट, शिस्त आणि देशसेवेची जिद्द दाखवली. त्यांच्या भरतीमुळे आमच्या अकॅडमीचा मान उंचावला आहे. प्रत्येक तरुणामध्ये क्षमता असते; फक्त योग्य मार्गदर्शन आणि नियमित प्रशिक्षणाची गरज असते.” अकॅडमीचे संचालक प्रशिक्षक, सेना निवृत्त एसीपी हवालदार महाले जी. वाय
त्यांच्या मार्गदर्शनाखाली परफेक्ट करिअर अँड फिटनेस अकॅडमी सतत ग्रामीण भागातील युवकांना सैन्य, पोलीस, CRPF, BSF, ITBP आदी भरती परीक्षांसाठी प्रशिक्षण देत आहे. आतापर्यंत अनेक प्रशिक्षणार्थी या अकॅडमीमधून विविध सुरक्षा दलांमध्ये दाखल झाले आहेत.
याच यशाचा ध्यास घेऊन परिसरातील जास्तीत जास्त तरुणांनी अकॅडमीत दाखल होऊन देशसेवेचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिस्त, परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि फिटनेस यांच्या जोरावर कोणताही युवक भारतीय सैन्यात दाखल होऊ शकतो, हे या तिघांनी सिद्ध केले आहे.
परफेक्ट करिअर अँड फिटनेस अकॅडमी
महाले फिजिकल्स, वागजवाडी/किकवी देशसेवेसाठी सज्ज योद्धे घडवण्याचा विश्वासार्ह मार्ग,


