खंडाळा ग्रामीण रुग्णालयातील विज बिल न भरल्याने रुग्णांची हेळसांड सात प्रतिष्ठानेआवाज उठवल्याने विद्युत कनेक्शन जोडले
संपादक : दिलीप वाघमारे
खंडाळा ग्रामीण रुग्णालयातील विज बिल न भरल्याने याविषयी थकबाकी भरावी म्हणुन वारंवार सुचना देऊनही याबाबत संबंधित ग्रामीण रुग्णालय विभागाने थकबाकी भरण्यास टाळाटाळ केल्याने विज महावितरण कंपनी वतीने खंडाळा ग्रामीण रुग्णालयाची विज खंडित करण्यात आली व यामुळे अनेक अबालवृद्ध रुग्णांना एक्सरे आदी मशीनिरी बंद राहिल्याने अनेक तास ताटकळत बसावे लागले.
या रुग्णालयात परगावाहून आलेल्या रुग्णांना भर उन्हाळ्यात अन्न पाण्यापासून वंचित राहत उपचाराअभावी वेदना सहन करावे लागत असताना याबाबत माहिती साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांना समजली. यावेळी कय्युम मुल्ला यांनी तेथे धाव घेतली व संबंधित कर्मचारी, रुग्ण यांबरोबर चर्चा केली असता कुणाला दम लागत असल्याने तर कुणाला फ्रॅक्चर आदी कारणांमुळे या रुग्णालयात उपचारासाठी ताटकळत बसावे लागले असल्याचे समोर आले तर काही रुग्णांना रुग्ण वाहिकेतुन सभौतालच्या ग्रामीण भागातून आणल्याचे समोर आले.
या गैरसोयीची गांभीर्य लक्षात घेऊन साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी संबंधित विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मोबाईल फोन द्वारा संपर्क साधून या गांभीर्याबाबत कल्पना दिली व सदर विज जोडण्याची विनंती केली. या विनंतीची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकारी यांनी रुग्णांची गैरसोय दुर करत तातडीने विज कनेक्शन जोडलेने सुमारे सकाळी 10:00 वाजले पासून दुपारी 02:30 वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला आणि तातडीने रुग्णांना उपचार सुरू झाले.
यावेळी उपस्थित अबालवृद्ध रुग्णांनी साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांचे प्रयत्नांना यश मिळालेने आभार व्यक्त करुन आशिर्वाद देत समाधान व्यक्त केले.
यावेळी खंडाळा महावितरण अधिकारी यांनी केलेल्या विनंतीची दखल घेतली बद्दल साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी त्यांचे आभार व्यक्त केले व संबंधित ग्रामीण रुग्णालयातील असा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर न आनता रुग्णांना सर्व सुविधा द्याव्यात व थकित विज बिले तातडीने अदा करावी म्हणून विनंती सुचना केली.


