फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची माणुसकीची कामगिरी कौतुकास्पद:- अनुप शहा


संपादक: दिलीप वाघमारे

ADVERTISEMENT

फलटण. आज दिनांक 10 मार्च2025 रोजी फलटण विंचुरनी रस्त्याला अंदाजे 18 वर्षे वयाची एक युवती घाबरलेल्या आणि विमनस्क अवस्थेत येथील श्री शिरीष वेलनकर. आणि रहिवाशांना आढळून आले. असता त्यांनी तातडीने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून सदर मुलीला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री सुनील महाडिक यांनी तातडीने आपले पोलीस हवालदार शांतीलाल ओंबासे, उर्मिला पेंदाम, नवनाथ काटेलवाड, शिवराज जाधव यांना तातडीने फलटण विंचुरणी रस्त्याकडे पाठवून सदर मुलगी पोलीस स्टेशन येथे आणण्यास सांगितले. पोलीस हवालदार शांतीलाल ओबासे आणि पेंदाम मॅडम यांनी तिच्याकडे विश्वासात घेऊन आस्थेने चौकशी केली असता ती थोडी मानसिक दृष्ट्या कमकुवत असल्याचे आढळून आले. तिची आस्थेने चौकशी केली असता तिने आपले नाव आणि गाव सांगितले
दरम्यानच्या वेळेत फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शाह आपल्या सहकाऱ्या समवेत काही कामानिमित्त फलटण शहर पोलीस स्टेशन येथे आले होते. यावेळी त्यांनी या मुली बाबत माहिती घेतली असता उर्मिला पेंदाम या पोलीस महिला हवालदार यांनी सांगितले की ही मुलगी विंचूरणी येथे एकटीच आढळून आलेली आहे .आम्ही तिला आत्ताच पोलीस स्टेशन येथे घेऊन आलेलो आहोत. आणि ती तिचे नाव मनीषा मारुती खटके, राहणार खटके वस्ती असे सांगत आहे.
यावरून श्री अनुप शहा यांनी पूर्व भागातील मनोज तात्या गावडे आणि पिंटू शेठ ईवरे यांच्याशी संपर्क साधून सदर मुलीची माहिती दिली .त्यांनी ताबडतोब फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला खटके वस्ती येतील निखिल खटके आणि अनिकेत मींड यांना पाठवून मुलीच्या नातेवाईकाशी संपर्क करण्यास सांगितले. त्यानुसार मुलीचे नातेवाईक आम्ही येऊन घेऊन जातो असे पोलीस स्टेशनला सांगण्यात आले.
आज महावीर जयंतीचे औचित्य साधून श्री अनुप शहा तसेच फलटण शहरातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. सूर्यकांत दोशी, सकल जैन समाज फलटण यांच्यावतीने या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला जोशी , अनुप शहा यांचे निकटचे सहकारी दिगंबर लाळगे आणि सागर शेट तडे, डॉ. सूर्यकांत दोशी, आणि अनुप शाह यांनी यावेळी सांगितले की आज महावीर जयंतीच्या निमित्ताने आम्हाला एक पुण्य कर्म करण्याची संधीच भगवान महावीर यांनी दिलेली आहे त्यांच्या जगा आणि जगू द्या या संदेशानुसार तिच्या उपचारासाठी लागणारी मानसोपचार तज्ञाची गरज आणि उपचार आम्ही सर्वजण करणार आहोत.
यावेळी मुलीच्या चौकशीसाठी तातडीने आलेले खटके वस्ती येथील युवक निखिल खटके आणि अनिकेत मिंड यांचाही सत्कार श्री अनुप शहा यांनी केला. या मुलीची ओळख पटवण्यास या युवकांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी फलटण येथील व्यवसायिक आणि सातारा न्यूज चे पत्रकार श्री राजाभाऊ बोंद्रे यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री सुनील महाडिक आणि कर्मचारी ओंबासे, काटेलवाड, जाधव, आणि उर्मिला पेंदाम महिला पोलीस हवालदार यांच्या तत्परतेचे विशेष कौतुक केले.
तसेच अनुप शहा, डॉ. सूर्यकांत जोशी, आणि सागर तडे यांनी या मुलीच्या उपचारासाठी मदतीचे जे आश्वासन दिले त्याबाबतही त्यांचे आणि सकल जैन समाजाचे विशेष आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!