भोर तालुक्याचे सहाय्यक निबंधक पालवे यांचा सहकार भारतीचे वतीने सत्कार


भोर : महाराष्ट्र शासनाचे सहकार विभागातील, सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था , भोर या पदाचा पदभार आदिनाथ पालवे यांनी स्विकारला असून आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त त्यांचा यथोचित सत्कार सहकार भारतीचे भोर तालुका अध्यक्ष सदाशिव धुमाळ यांचे हस्ते करण्यात आला.या वेळी बोलतांना पालवे यांनी येत्या काही दिवसांत तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटींच्या सचिवांचा एक मार्गदर्शनपर

ADVERTISEMENT

मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच,सहकार भारती ही १९७८ मध्ये सहकार क्षेत्राच्या उत्थानासाठी स्थापन झालेली
समर्पित संघटना असून गेली ४७ वर्षे या संघटनेचे कार्य अविरतपणे सुरू असून संपूर्ण देशभरातील पाचशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये सहकार भारतीचे कार्य अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे.
बिना सहकार नही ऊध्दार हे सहकार चळवळीचे ध्येयवाक्य आहे. परंतु सहकार हा ख-या अर्थाने यशस्वी व कार्यान्वित व्हावयाचा असेल तर त्यातील काम करणारे सर्वच लहान थोर कार्यकर्ते हे समाजसेवी वृत्तीचे असले पाहिजेत म्हणून सहकार भारती ने बिना सहकार नही ऊध्दार या ध्येय वाक्याला बिना संस्कार नही सहकार अशी अर्थपूर्ण जोड दिली आहे व या दोन वाक्यातूनच आपल्या कार्याची दिशा स्पष्ट केली आहे.सहकारी साखर कारखान्यातील कामाचा अनुभव असल्यामुळे सहकार भारतीच्या माध्यमातून तालुक्यात सहकारी संस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न निश्चित केले जातील असे मत धुमाळ यांनी व्यक्त केले.
या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे भोर तालुक्याचे
विभागीय विकास अधिकारी मारणे यांचा देखील सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सहकार भारतीच्या भोर तालुका महिला प्रमुख सौ.आशाताई शिवतरे व इतर कर्मचारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!