डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर ची दैयनिय अवस्था सेल्फी विथ समस्या आंदोलनातून रहिवासी नागरिकांनी फोडला टाहो….


संपादक दिलीप वाघमारे

लोणंद शहरात रेल्वेने अतिक्रमण कारवाई केले नंतर विस्थापित झालेल्या नागरिकांनी रेल्वे स्थानक नजीकचे आपली छोटे छोटे निवारा स्थान उभारणी करुन जगण्यासाठी दिशा देणारे संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर यांचे नाव देऊन छोटी वसाहत स्थापन केली आहे. या वसाहतीतील रहिवासी अनेक समस्यांना तोंड देत जगत आहेत त्यांना नगरपंचायत वतीने कोणत्याही प्रकारचे मुलभूत सुविधा मिळत नाहीत, इथले रहिवासी नागरिकांची मतदान यादीतील नावे फक्त मतदानासाठी व स्वार्थी भावनेच वापर होत आहे. कोणत्याही प्रकारचे सुविधा उपलब्ध होत नसल्याने वारंवार लोणंद नगरपंचायत कडे निवेदने दिली तरी कोणीही दखल घेतली गेली नाही.

ADVERTISEMENT

लोणंद येथील सामाजिक कार्यकर्ते कय्युम मुल्ला यांनी सुरू केलेल्या सेल्फी विथ समस्या या आंदोलनाची माहिती मिळताच येथील रहिवासी नागरिकांनी या आंदोलनास पाठिंबा देऊन सर्व समस्यांचे सेल्फी काढून आपल्या व्यथा मांडल्या आहेत व या समस्या निवारण केल्या नाहीत तर जिथे जिथे समस्या आहेत तेथे तेथे अधिकारींचे फोटो चिकटवून निषेध करु असा इशाराही त्यांनी दिला आहे.

यावेळी युवा नेते राजु कांबळे, जयवंतराव बनकर, संदिप मलखे, संतोष वाघमोडे, अनिल पवार व महिला रहिवासी बहुसंख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!