घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण व आळेफाटा पोलिसांनी केली अटक, पाच गुन्हे उघडकीस ‘ आरोपींना ठोकल्या बेड्या..!!
संभाजी पुरीगोसावी
(पुणे जिल्हा) प्रतिनिधी. आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी करून चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना अटक करून त्यांच्याकडून 05 गुन्हे उघडकीस आणुन एकूण 7 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने 180 ग्रॅम वजनाची चांदीचे मुकुट रोख रक्कम असा एकूण 8 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि आळेफाटा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी आरोपी नामे. मोहन भिकाजी भोसले (वय 20 )किशोर हापूस भोसले (वय 20) दोघे रा. कासाटी ता.आष्टी जि.बीड) अशी आरोपींची नावे आहेत. सदर घरफोडी गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा आणि आळेफाटा पोलिसांनी सदर संशयित आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी पाच घरफोड्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. यामध्ये एकूण 7तोळे वजनाचे सोन्याचे दागिने 180 ग्रॅम वजनाचे चांदीचे मुकुट रोख रक्कम मोटरसायकल असा एकूण 850,000/ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आळेफाटा पोलिस ठाणेचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव मंचर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत स.पो.नि. प्रवीण सपांगे स.पो.नि. महादेव शेलार अमित सिदपाटील विक्रम तापकीर दीपक साबळे यांच्यासह आळेफाटा पोलीस ठाणेकडील आणि स्थानिक गुन्हे शाखेकडील आदीं पोलिसांनी या कारवाई सहभाग घेतला.


