नसरापूर गणातील युवाशक्तीचा उमेदवार! सूरज (बंटी) हनुमंत जगताप विकासाच्या वाटचालीसाठी सज्ज.
मंगेश पवार
नसरापूर :भोर-वेल्हा तालुक्यातील युवासेनेचे कार्यक्षम आणि जनसंपर्कात पारंगत संघटक सूरज (बंटी) हनुमंत जगताप यांनी आगामी स्थानिक निवडणुकीत नसरापूर गणातून उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तरुण, उत्साही आणि समाजकारणात सक्रिय असलेले जगताप हे गेल्या काही वर्षांपासून गाव आणि परिसरातील विकासकामांमध्ये शिवसेना नेते मा. जि. प. सदस्य कुलदीप कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत कार्यरत आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्कृष्ट आयोजन, पीएमआरडीए घरकुल योजना राबविण्याचे प्रयत्न, तसेच गावातील रस्ते, पाणी आणि शैक्षणिक सोयीसुविधा सुधारण्यासाठी केलेले योगदान यामुळे त्यांची ओळख एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून झाली आहे.
कोरोना काळात त्यांनी “ग्रामदूत” म्हणून जबाबदारी स्वीकारत, गावातील नागरिकांना आवश्यक सेवा, औषधे व अन्नधान्य पुरवले. तसेच, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून शिक्षणाची गती टिकवून ठेवण्याचे कामही त्यांनी केले.
सामाजिक कार्यासोबतच युवकांच्या रोजगार आणि क्रीडा विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले असून, तरुणांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे.
जगताप यांच्या उमेदवारीनंतर नसरापूर गणात नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, युवाशक्तीचा आवाज स्थानिक स्वराज्यात पोहोचविण्याचा त्यांचा निर्धार दिसून येतो.
“गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्य माणसाचा आवाज पोहोचवण्यासाठी मी उभा आहे,”
असे सूरज (बंटी) जगताप यांनी ‘पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज’चे संपादक मंगेश पवार यांच्याशी बोलताना सांगितले.


