गौरी गणपती सजावट स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार


मंगेश पवार

भोर : शिवसेना (शिंदे गट) आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात

1) जयश्री अमोल वाल्हेकर यांना पहिले बक्षीस फ्रिज,

2) राजश्री प्रसाद वीर यांना टीव्ही,

3) अनिता प्रमोद लेकावळे यांना वॉशिंग मशीन

4) सारिका चव्हाण यांना आटा चक्की,

5)मनीषा संतोष बोरगे यांना मिक्सर असे देण्यात आले.

 

समाजसेवेतील योगदानाबद्दल क्रांती धुमाळ यांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शेतकऱ्यांना आवश्यक साहित्य वाटप आणि राजगड प्रीमियर लीगसाठी दिलेल्या मदतीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

 

या कार्यक्रमात शिवसेनेचे मुख्य नेते, मा. मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांना वंदन करण्यात आले.

ADVERTISEMENT

कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे, मा. जि. प. सदस्य कुलदीप कोंडे,ता. प्रमुख दशरथ जाधव, अमोल पांगारे, विकास चव्हाण , सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने डीजे बंदीपासून ते हंडी, नवरात्र उत्सव आणि पालख्यांना अनुदान देण्यापर्यंत अनेक संवेदनशील आणि जनहितकारी निर्णय घेतले असल्याचे पुणे जिल्हा परिषद मा.सदस्य रमेश कोंडे यांनी सांगितले.

 

 “भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी मिळाल्यास विकासाचा वेग अधिक वाढेल, शिवसेना हा पक्ष कधीही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. समाजकार्य हेच आमचं ध्येय असून, भोर तालुक्यातील कार्यकर्ते राजकारण बाजूला ठेवून समाजासाठी काम करत आहेत. जनता आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही.”

शिवसेना नेते कुलदीप कोंडे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!