पिस्तूल घेवुन फिरणाऱ्या दोघांना बेड्या… सैदापुरात धडक कारवाई, गावठी पिस्तूलासह जिवंत काडतूसे हस्तगत… कराडच्या उपविभागीय कार्यालयातील पोलिसांची कामगिरी…!!
संभाजी पुरीगोसावी
(सातारा जिल्हा) प्रतिनिधी. कराड शहरांमध्ये बेकायदेशीर गावठी पिस्तूल घेवुन फिरणाऱ्या दोघांना कराडच्या उपविभागीय कार्यालयातील विशेष पथकांतील पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई कराड उपअधीक्षक यांच्या विशेष पथकांने केली आहे. यामध्ये संशयित आरोपींकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. अल्तमेश उर्फ मोन्या अरुण तांबोळी (वय 25) रा. पालकरवाडा मंगळवार पेठ कराड) व ओंकार दीपक जाधव (वय 22) रा. होली फॅमीली विद्यानगर सैदापूर ता. कराड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. मोन्या तांबोळी व ओंकार जाधव हे दोघेजण पिस्तूल घेवुन फिरत असल्याची माहिती कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राज्यश्री पाटील यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने डीवाय एसपी पाटील यांनी आपल्या विशेष पथकांला कारवाईच्या आदेश जारी केले होते. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कुकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमित बाबर पोलीस अंमलदार प्रवीण पवार सागर बर्गे प्रशांत चव्हाण मयूर देशमुख आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभागी घेतला.


