न्हावी शाळेत ‘टॉयब्ररी’ उपक्रमाचा शुभारंभ – अनुभवाधारित शिक्षणाला नवी दिशा


संपादक: मंगेश पवार

कार्यकारी संपादक: सागर खुडे

सारोळे (भोर )राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 व CBSE पॅटर्ननुसार शालेय शिक्षणाला नव्या उंचीवर नेणारा ‘टॉयब्ररी’ उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, न्हावी येथे सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक खेळणी, पझल्स, ब्लॉक्स, विज्ञान उपकरणे, भाषाविकास साधने यांचा अनुभव मिळावा, यासाठी हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

 

पुणे येथील मेहता प्रेसिंग कंपनीचे उद्योजक  तुषार मेहता यांच्या हस्ते टॉयब्ररीचे उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत न्हावी-322 च्या सरपंच शितल सोनवणे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मंगलांजली किडनी संजीवन फाउंडेशनचे  देविदास देशपांडे, सतीश मिसर, रचना सामाजिक संस्थेच्या निकिता निगडे उपस्थित होते.

 

या उपक्रमासाठी नवज्योत परिवार ट्रस्टचे अध्यक्ष  संजय लगाडे व सचिव शितल लगाडे यांनी नवीन व जुनी खेळणी देऊन मोलाचे योगदान दिले. त्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

ADVERTISEMENT

 

टॉयब्ररीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य, सर्जनशीलता, सहकार्य, समस्या सोडवण्याची क्षमता, आणि चिंतनशीलता यांसारखी २१व्या शतकातील कौशल्ये विकसित होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच हा उपक्रम NEP 2020 व CBSE च्या ABL (Activity-Based Learning) पॅटर्नशी व सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन या धोरणांशी टॉयब्ररी पूर्णतः सुसंगत असल्याने ग्रामीण शिक्षणात सकारात्मक बदल घडवणार असल्याचे सरपंच शितल सोनवणे यांनी सांगितले.

 

हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.

 

शाळेतील शिक्षक-दांपत्य अनिल चाचर आणि रूपाली पिसाळ(चाचर ) यांनी या उपक्रमाची संकल्पना राबवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांना पुनम सोनवणे व सोनाली बोन्द्रे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल चाचर यांनी, सूत्रसंचालन रूपाली पिसाळ यांनी व आभार प्रदर्शन संदीप मोरे यांनी केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!