किसन वीर व खंडाळ्याचे ऊस बील जमा १६ कोटी ७६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग.


 

वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण

दि. १३/५/२४ : किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे १ ते १५ डिसेंबरपर्यंत गळितास आलेल्या ऊसाच्या बीलाची रक्कम प्रति मेट्रिक टन ३ हजार रूपयांप्रमाणे १६ कोटी ७६ लाख ८१२ एवढी रक्कम संबंधित ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी माहितीप्रत्रकाद्वारे दिली.

 

माहितीप्रत्रकात पुढे म्हटले आहे की, कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी सुतोवाच केल्याप्रमाणे नुकतीच नोव्हेंबर महिन्याची बीलेही आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली आहेत. आज (दि. १३) डिसेंबरमध्ये १ ते १५ या कालावधीत गाळपास आलेल्या ऊसाचे बील १६ कोटी ७६ लाख ८१२ रूपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग केलेले आहेत. साखरेच्या भावामध्ये चढ-उतार तसेच साखरेस उठाव नसल्याने आपल्या संचालक मंडळास बीले देण्यास विलंब होत आहे. उर्वरित पंधरवड्यांची बीलेही लवकरात लवकर जमा करणार असून सभासदांनी आतपर्यंत जो संयम व विश्वास संचालक मंडळावर दाखविला आहे, त्याबद्दल संचालक मंडळाच्यावतीने आभारही श्री. शिंदे यांनी मानले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!