स्वराज फाऊंडेशनमार्फत उंबरे येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन.


 

भोर प्रतिनिधी : सागर खुडे

डॉ.ख्याती मेहता आणि स्वराज फाउंडेशन या दोन्हींच्या संयुक्तं विद्यमाने,आणि उंबरे गावातील सामाजिक कार्यकर्ते रामदास खुटवड यांच्या संकल्पनेतून काल १३में रोजी महिलांना मोफत शिलाई मशीन मेहता मॅडम यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या. या संस्थेमार्फत दरवेळी अशी समाज उपयोगी कार्ये केली जातात,या आधी देखील उंबरे आणि आसपासच्या पंचक्रोशीमध्ये असे उपक्रम संस्थेनं यशस्वीरित्या रांबवले आहेत.

 

ADVERTISEMENT

महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरण करून त्यांना व्यावसायिक पाठबळसोबत आर्थिक हातभार मिळवून देण्याचा मूळ उद्देश संस्थेचा असल्याचे मत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान असलेल्या डॉक्टर ख्याती मेहता यांनी मांडले.

कार्यक्रमाचे आयोजन उंबरे गावातील सामाजिक कार्यकर्ते रामदास दादा खुटवड यांनी केलं. त्यासोबत गावातील होतकरू आणि सामाजिक कार्यात नेहमीच हिरीरीने सहभाग दर्शवणारा पुणे जिल्हा विद्यार्थी युवक काँग्रेस सरचिटणीस आनंद खुडे, गावातील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष,शिवसेनेचे नेते आदित्य बोरगे गावातील ग्रामस्थ,महिला वर्ग आदी मंडळी या प्रसंगीच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!