अनैतिक संबंधातून पत्नीला जाळून,खून करणाऱ्या पतीला वारजे माळवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या… वारजे माळवाडी पोलिसांनी पतीला केला बोलता !
संभाजी पुरीगोसावी
(पुणे शहर) प्रतिनिधी. अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीचा आवळून गळा खून केल्यानंतर पतीने तिचा मृतदेह गॅरेज मध्ये जाळला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने राख नदीत टाकून दिली आणि पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र खोण्याच्या सखोल तपास करून पोलिसांनी खून प्रकरणात उलगडा केला आहे. एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे आरोपी पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले या प्रकरणी आरोपी पतीला अखेर वारजे माळवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अंजली समीर जाधव (वय 38 ) रा. श्री.स्वामी समर्थ संकुल एनडीए वारजे रस्ता शिवणे ) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर या प्रकरणी पती समीर पंजाबराव जाधव (वय 42 ) याला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नी अंजली ही 28 ऑक्टोबर रोजी वारजे माळवाडी परिसरांतून बेपत्ता झाल्याचे तक्रार आरोपी समीर यांनीच वारजे माळवाडी पोलिसात दिली होती. या प्रकरणाचा कोणताही धागाद्वारा नसतानाही तपास करून खून प्रकरणाचा उलगडा केला मात्र पतीच आरोपी निघाला अशी माहिती परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त संभाजीराव कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. मात्र आपल्या पत्नीचे एकाशी प्रेम प्रकरण सुरू असल्याची माहिती पतीला कोणीतरी दिली होती त्यामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद निर्माण होत होते. आणि पती समीर हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत राहिला अखेर त्याने आपल्या पत्नीला खेडशिवापूरच्या परिसरांत नेवुन पत्नीचा शेवट केला. आणि माझी पत्नी बेपत्ता झाली म्हणून पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी सखोल तपास करून आरोपी पती समीर पर्यंत पोहोचून त्यास चांगलेच बोलते केल्यानंतर आरोपी पतीने अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीच्या खूनाची कबुली पोलिसांना दिली. सदरची कारवाई पोलीस उपायुक्त संभाजीराव कदम सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे निलेश बडाख गणेश कर्वे सुनील मुठे योगेश वाघ शरद पोळ शिरीष गावडे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.


