पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर यांनी सांगली शहर पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारला, शहरांच्या पोलिस ठाणेत आता खमक्या अधिकारी..!!
सांगली जिल्हा प्रतिनिधी. सांगली जिल्हा पोलिस दलात जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशावरून वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणेच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून. यामध्ये सांगली शहर सांगली ग्रामीण मिरज शहर कवठेमहांकाळ पलूस शिराळा कुपवाड अन्य पोलीस ठाणेला नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तर काही अधिकार्यांना मुख्यालयात पदस्थापना देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर हे गेले दीड वर्षापासून सांगली जिल्ह्यात रूजू झाल्यापासून त्यांनी मिरज शहर तसेच सांगली पोलीस मुख्यालयात विविध पदावर काम पाहिले आहे. त्यांनी यापूर्वी मिरज शहर पोलीस निरीक्षक म्हणून देखील काम पाहिले आहे. कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांची नव्याने सांगली शहर पोलीस निरीक्षक म्हणून त्यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर सांगली शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनीही सांगली शहर पोलीस ठाणेचा पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्यांच्या कार्यकाळामध्ये शहरांमध्ये वाहतूक समस्या तसेच इतर गुन्ह्यांचा छडा लावण्यात यशस्वी ठरले, नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर यांनी शुक्रवारी सांगली शहर पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारला यावेळी मावळते पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.

