धांगवडी येथे भाजपा पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक!मोहिते यांनी घेतला कमळ चिन्ह हाती
मंगेश पवार
कापूरहोळ :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पदवीधर तसेच शिक्षक मतदार नोंदणीच्या अनुषंगाने संघटनात्मक रचना आणि संवाद साधण्यासाठी आज, रविवार दि.१९ ऑक्टोबर २०२५ रोजी भोर, राजगड, मुळशी विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक पार पडली. शिवाजीराजे इंजिनिअरिंग कॉलेज, धांगवडी (भोर) येथे ही बैठक झाली.
यावेळी मा. आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत, ऍड. धर्मेंद्र खांडरे (पदवीधर पुणे जिल्हा प्रमुख), शेखर वढणे (पुणे जिल्हा दक्षिण अध्यक्ष), जीवन कोंडे (पुणे जिल्हा उपाध्यक्ष), रवींद्र कंक (भोर तालुका अध्यक्ष दक्षिण), संतोष धावले (भोर तालुकाध्यक्ष उत्तर), राजेंद्र निगडे (भोर तालुका उपाध्यक्ष), माणिक शिळीमकर (शेतकरी संघटना उपाध्यक्ष दक्षिण), सुरज चव्हाण (भोर तालुका युवा अध्यक्ष) भाजपा पुणे सरचिटणीस बाळासाहेब गरुड, विनोद चौधरी, राजेंद्र धाडवे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला, तसेच मतदार नोंदणीवर विशेष भर देण्यात आला.
संतोष मोहिते यांचा भाजपमध्ये प्रवेश
या बैठकीदरम्यान भोंगवली गावचे सुपुत्र आणि शिवप्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते यांनी भाजपमध्ये अधिकृत पक्ष प्रवेश केला. जिल्हा व तालुका भाजप मान्यवरांच्या उपस्थितीत, माननीय माजी आ.संग्राम थोपटे यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. त्यांच्या प्रवेशाने भोर तालुक्यातील पक्षाच्या संघटनात्मक कार्याला बळ मिळणार व तालुक्यातील भाजप संघटनेला नवी उर्जा लाभली असून, स्थानिक पातळीवर पक्ष अधिक मजबूत होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.