जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या… घोडेगांव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची दमदार पोलिसांची कामगिरी!


संभाजी पुरीगोसावी

ADVERTISEMENT

पुणे ग्रामीण विभागातील घोडेगांव पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये घोडेगांव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पेट्रोलिंग करीत असताना एका विनानंबर मोटरसायकल वरून येणाऱ्या संशयित तिघांनाही पोलिसांची चाहूल लागली होती. या तिघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी ताब्यात असणाऱ्या दोघांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी घरफोडी करण्यासाठी आलो असल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्या ताब्यातील दुचाकीची ही पडताळणी केली असता त्यांनी घरफोडी करण्यासाठी दुचाकी चोरल्याचे पोलीस तपासास समोर आले आहे. त्या अनुषंगाने घोडेगांव पोलीस ठाणेच्या हद्दीत रात्रीच्या सुमारांस या दोन आरोपींना घोडेगांव पोलीस ठाणेत आणून जबरी चोरी व घरफोडी प्रकरणी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस तपासात सुमारे 63.200 रुपयांचा दागिने रोख रक्कम व चोरीस गेलेली मोटरसायकल कटावणी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये आरोपी नामे. सुनील उर्फ पोट्या विलास मधे रा. जवळा ता. पारनेर जि. अहमदनगर) धनंजय संजीव काळे रा. गुणोरे ता. पारनेर जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी यापूर्वीही पुणे जिल्ह्यात घरफोडी केली आहे का? यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का याची देखील पोलीस तपास करीत आहेत. मात्र या आरोपींवर सन 2016 मध्ये शिक्रापूर पोलीस ठाणेतही गुन्हा दाखल आहे. अधिक तपास रवींद्र सुरकले करीत आहेत. सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगांव पोलीस ठाणेचे स पो.नि. सागर पवार स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक महेश पवार रवींद्र सुरकले भरत केंदार मनिषा तुरे समीर कांबळे सरला सुरकले जालिंदर शहाणे भाऊ कोटके नामदेव ढेवळे अनिल भोईर निलेश तळपे आशुतोष पानसरे रामदास तनपुरे यांच्यासह घोडेगांव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे इतर अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!