केळघरच्या अक्षय सुरेश धनावडेची लघु लेखकपदी निवड.
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
केळघर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत घेण्यात आलेल्या उच्च श्रेणी लघुलेखक परीक्षेद्वारे उच्च श्रेणी लघु लेखकपदी केळघर येथील अक्षय सुरेश धनावडे याची निवड झाली आहे. पहिल्याच प्रयत्नात अक्षयने हे यश मिळवले असून त्याची नियुक्ती मंत्रालयात झाली आहे. अक्षयचे शिक्षण मेढा येथील आ. शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे झाले आहे. दुर्गम भागातील असूनही पहिल्याच प्रयत्नात अक्षयने मिळवलेले हे यश प्रेरणादायी आहे. पहिल्यापासून प्रशासनात जायची आणि काही तरी वेगळ करायची इच्छा होती. त्यामुळे या क्षेत्राची निवड केली असून या यशात आई-वडील नातेवाईक आणि मित्र मंडळीचा मोलाचा वाटा असल्याचे अक्षयने सांगितले. कठोर परिश्रम, सातत्त्यपूर्ण अभ्यास यामुळे अक्षयने हे यश मिळवले असून त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


