आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेजुरी निरा या दोन मोठ्या गावांमधून पोलिसांचा रूट मार्च, जातीय,सामाजिक तेढ निर्माण केल्यास कारवाई करणार :- सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाघचौरे.
संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.
राज्यांत सध्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे तसेच या निवडणुका शांततेत पार पडाव्यात तसेच आगामी सण उत्सव साजरे होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनही चांगलेच सतर्क झाले असून. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी सण, उत्सवांच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ग्रामीण भागात कुठेही अनुचित घटना घडू नये याकरिता शांतता व सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने जेजुरी पोलिसांचा नुकताच रूट मार्च काढला आहे. सदर रूट मार्च हा जेजुरी निरा पोलीस ठाणेपासुन ते जेजुरी शहरांत व निरा परिसरांतील व अशा मोठ्या गावांमधून तसेच ग्रामीण भागातील गावांमधून रूट मार्च करीत नागरिकांना पोलिसांनी सूचना केल्या. सदर रूट मार्च पुणे ग्रामीणचे अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस रमेश चोपडे गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.पोलीस दिपक वाघचौरे पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह दोन पोलीस अधिकारी जेजुरी पोलीस ठाणेकडील पोलिस अंमलदार तसेच सीआरपी जवानांसह आदींनी या रूट मार्चमध्ये सहभाग आपला नोंदवला.


