भोंगवली पंचायत समितीसाठी दोन इच्छुक पण एकच ध्येय — पक्षनिष्ठा आणि विकास!
मंगेश पवार
सारोळे :- भोर तालुक्यातील राजकारणात सध्या या दोघा युवा नेत्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. एकाच पक्षात असलेले आणि दोघेही इच्छुक असले तरी, स्वतःलाच तिकीट मिळावे म्हणून कोणतीही स्पर्धा नाही, हेच या दोघांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे.
यंदाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून इच्छुकांची संख्या वाढली आहे. मात्र शिंदे गटाच्या शिवसेनेतून हर्षद बोबडे सर आणि विकास चव्हाण हे दोन इच्छुक पुढे आले आहेत. दोघांचंही म्हणणं स्पष्ट आहे — “पक्ष ज्याला तिकीट देईल, त्याचं काम प्रामाणिकपणे आणि एकदिलाने करायचं.”
कुलदीप कोंडे यांचे हे दोन्ही विश्वासू सहकारी असून, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच या दोघांचे तिकीट फिक्स झाले आहे. पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य करून पक्षाला कोणताही धक्का न पोहोचवता संघटन मजबूत ठेवण्याचा दोघांचा निर्धार आहे. त्यामुळे या दोघांनी तालुक्यात एक आदर्श संदेश दिला आहे — “स्पर्धा नव्हे, सहकार्य आणि संघटन!”
कुलदीप कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व भागामध्ये ‘लाडकी बहिनी योजना’, ‘श्रम कार्ड’, ‘भांड्यांचे फॉर्म’ आदी विविध उपक्रमांच्या माध्यमातून पूर्व भागात मजबूत संपर्क निर्माण करणारे हर्षद बोबडे सर आणि विकास चव्हाण लोकांच्या मनात स्थान मिळवत आहेत.
एवढेच नव्हे, तर पूर्व भागातील महिलांचा पूर्ण पाठिंबा असणारे हे नेतृत्व आज महिलांच्या, जेष्ठ नागरिकांच्या आणि तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
शिंदे गटाच्या माध्यमातून सातत्याने विकासकामे राबवणारे हे दोघे नेते आगामी काळात भोंगवली पंचायत समितीवर भगवा झेंडा फडकवतील, अशी तालुक्यात कुजबूज सुरू आहे.
लोकांचा विश्वास, संघटनेचा पाठिंबा आणि पक्षनिष्ठा या त्रिसूत्रीवर उभं राहिलेलं हे नेतृत्व निश्चितच भोर तालुक्याच्या राजकारणात नवा अध्याय लिहिणार आहे.


